आजकालच्या धावपळीच्या जीवनात असलेला हृदयरोगांचा धोका एक चिंतेचा विषय आहे. आधी हृदयरोग हा वृद्ध लोकांनाच होणारा आजार समजला जात होता. पण आजकाल कमी वयातही लोकांना वेगवेगळ्या हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, तुमचं हृदय निरोगी आहे की नाही. एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट अॅटॅकच्या धोक्याबाबत जाणून घेऊ शकता. याला “सिटिंग-रायजिंग टेस्ट” म्हटलं जातं. चला तर जाणून घेऊ या टेस्टबाबत आणि ती करून हृदयाची स्थिती कशी जाणून घ्याल.
काय आहे सिटिंग-रायजिंग टेस्ट
ही टेस्ट फारच सोपी आहे आणि ही तुम्ही घरीच करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ जमिनीवर बसायचं आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय उठायचं आहे. या टेस्टचा स्कोर तुमचा फिजिकल बॅलन्स, स्नायूंची शक्ती आणि फ्लेक्सिबिलिटीला दर्शवतो. या गोष्टी थेट हृदयाशी संबंधित आहे. केवळ हृदयाचंच आरोग्य नाही तर यातून पूर्ण शरीराच्या आरोग्याबाबत माहिती मिळते.
कशी कराल टेस्ट
कोणत्याही सपाट जागेवर कोणत्याही आधाराशिवाय सरळ उभे रहा. त्यानंतर हळूहळू जमिनीवर मांडी घालून बसा. खाली बसत असताना हातांनी गुडघ्यांचा आधार घेऊ नका. आता कोणत्याही आधाराशिवाय उभे रहा. जर तुम्ही कोणत्याही आधाराशिवाय खाली बसू शकत असाल आणि उभे राहू शकत असाल तर हा तुमचं हृदय फिट असल्याचा संकेत आहे. पण जर बॅलन्स ठेवण्यात अडचण येत असेल किंवा हातांचा आधार घ्यावा लागत असेल तर हा शारीरिक कमजोरी आणि हृदयरोगाच्या धोक्याचा इशारा आहे.
टेस्ट आणि हृदयरोगाचं कनेक्शन
या टेस्टच्या माध्यमातून फिजिकल बॅलन्स, कोर स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटी चेक करता येते. जर तुमचं शरीर फ्लेक्सिबल आणि मजबूत असेल, तर यातून हे कळतं की, तुमचे स्नायू आणि नर्व्स हेल्दी आहे, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. कमजोरी स्नायू आणि खराब बॅलन्समुळे हृदयरोगांचा धोका वाढतो.
हृदय कसं निरोगी ठेवाल?
रोज किमान ३० मिनिटं वॉक किंवा योगा करा.
आहारात फळं, भाज्या, कडधान्य यांचा समावेश करा.
स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर रहा
तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा.
(सोशल मीडियावरून साभार)