आरोग्य

एक रूपयाही खर्च न करता हाडं ठेवू शकता मजबूत

हाडं आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. कारण त्यांवरच तर आपलं शरीर टिकून आहे, उभं आहे. पण लोक तब्येत चांगली ठेवण्यासाठी जेवढी काळजी घेतात, तेवढी काळजी ते हाडांची घेताना दिसत नाहीत. यात एक आश्चर्याची बाब म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची किंवा वेगळा खर्च करण्याची सुद्धा गरज नसते. फ्रीमध्ये तुम्ही हाडं मजबूत करू शकता.

तुम्ही म्हणाल आजकाल फुकट काहीच मिळत नाही. पण असं काही नाहीये. तुम्ही हाडं मजबूत ठेवू शकता तेही फुकट. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय सूर्यकिरणांबाबत. सूर्यकिरणांच्या माध्यमातून तुम्ही व्हिटामिन डी मिळवू शकता. व्हिटामिन डी कॅल्शिअमसोबत मिक्स होऊन आपली हाडं निरोगी आणि मजबूत ठेवण्याचं काम करतं.

कशी काम करतात सूर्यकिरण

जेव्हा आपली त्वचा सूर्याच्या अल्ट्रावायलेट बी (UVB) किरणांच्या संपर्कात येते तेव्हा कोलेस्टेरॉलचा एक प्रकार व्हिटामिन डी मध्ये रूपांतरित होण्यास सुरूवात होते. या व्हिटामिन डी ला व्हिटामिन डी3 असंही म्हटलं जातं. नंतर ते लिव्हर आणि किडनीमध्ये सक्रिय होतं. हे व्हिटामिन डी हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं.

व्हिटामिन डी आणि कॅल्शिअमचं नातं

हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शिअम एक महत्वाचं तत्व आहे. पण जर शरीरात भरपूर व्हिटामिन डी नसेल तर शरीर कॅल्शिअमला योग्यपणे एब्जॉर्ब करू शकत नाही. व्हिटामिन डी छोट्या आतड्यांमध्ये कॅल्सिअमचं एब्जॉर्ब्शन वाढवतं.

ज्यानंतर ते ब्लड फ्लोमध्ये पोहोचतं. नंतर हे कॅल्शिअम हाडांमध्ये जमा होतं. त्यामुळे हाडं मजबूत ठेवण्यासाठी व्हिटामिन डी महत्वाचं ठरतं. जर ते कमी झालं तर हाडं कमजोर होतात आणि हाडांसंबंधी समस्यांचा धोका वाडतो.

किती फायदेशीर असत उन्ह

हाडं मजबूत ठेवण्यासाठी उन्ह घेण्याची योग्य वेळ महत्वाची ठरते. सामान्यपणे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यानची वेळ उन्हाला व्हिटामिन डी च्या प्रोडक्शनसाठी सगळ्यात प्रभावी मानली जाते. कारण या दरम्यान UVB किरणं जास्त अॅक्टिव असतात. तसेच तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हातही काही वेळासाठी बसू शकता.

किती उन्ह घ्याव

रोज किमान 10 ते 30 मिनिटं उन्ह घेतलं पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसाल तर त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. उन्हात बसले असताना तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर शरीराला व्हिटामिन डी पुरेसं मिळणार नाही. त्यामुळे थोडा वेळ सनस्क्रीन न लावता उन्हात बसावं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago