आरोग्य

आठवड्यातून दोनदा तरी खायलाच हवी मसूर डाळ; पहा काय आहेत फायदे

प्रोटीन म्हणजेच प्रथिने ही शरीरात तयार होत नाहीत तर ती आपल्याला आहारातून घ्यावी लागतात. आपली प्रत्येकाची प्रथिनांची गरज ही आपल्या वजनाइतकी असते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक जेवणात प्रथिनांचा आवर्जून समावेश असायला हवा असे सांगितले जाते. मांसाहार करणाऱ्यांचे ठिक आहे पण शाकाहार करणाऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. मात्र शाकाहार करणाऱ्यांनी आहारात पनीर, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, डाळी यांचा समावेश केल्यास त्यांनाही चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळू शकतात. आपण साधारणपणे तूर डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळीचा आहारात समावेश करतो. पण मसूर डाळ म्हणजेच केशरी रंगाची डाळ आपण आहारात घेतोच असे नाही. पण ही डाळ आरोग्यासाठी अतिशय चांगली असते तसेच ती पचायलाही हलकी असल्याने या डाळीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

मसूर डाळ खाण्याचे फायदे

1) वजन कमी करण्यास उपयुक्त: वजनवाढी ही सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावणारी समस्या आहे. मसूर डाळीतील ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नकळतच वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

2) डोळ्यांसाठी फायदेशीर: या डाळी मधून विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई मुबलक प्रमाणात मिळतं. तसेच प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंटमुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. दृष्टी अंधुक होणे, डोळ्यांची आग-जळजळ यांसारख्या समस्या भेडसावतात. पण मसूर डाळीचा आहारात समावेश केल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते.

3) हाडांचे आरोग्य चांगले राहते: या डाळीमधून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मिळतं, ज्यामुळे हाडांचं आरोग्य चांगले राहतं. ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांशी निगडीत समस्येचा धोका कमी होण्यासाठी मसूर डाळ फायदेशीर ठरते. तसेच मसूर डाळीतील गुणधर्मांमुळे स्नायूंची ताकद चांगली राहते.

4) पचनक्रियेसाठी फायदेशीर: आपली पचनक्रिया सुरळीत असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तूर किंवा हरभरा डाळ पचायला थोडी जड असते. मात्र मसूर डाळ मूगाच्या डाळीप्रमाणे पचायला हलकी असल्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.मसूर डाळीमुळे वातदोष वाढतो आणि कफ आणि पित्त दोष बॅलन्स राहतात.

5) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत: मसूर डाळीमध्ये असणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस पचण्याची क्रिया संथ असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी ही डाळ खाणे फायद्याचे ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

16 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

16 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

16 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

20 तास ago