महाराष्ट्र

9 वर्षाच्या मुलान लढवली अजब शक्कल, घरातून पळाला अन…

नवी दिल्ली: इंटरनेट हा माहितीचा अथांग महासागर आहे. तुम्हाला कोणत्याही विषयावर, कोणतीही माहिती हवी असल्यास ती एका क्लिकवर मिळते. इंटरनेटवर विषय सर्च केल्यावर त्याबद्दल असंख्य लेख, व्हिडिओ, माहिती, रिसर्च पेपर उपलब्ध होतात. अगदी एका क्लिकवर उपलब्ध असलेली ही माहिती खरं तर खूप सोईची आहे. पण हीच माहिती कधीकधी मोठ्या अडचणीचं कारणही ठरु शकते. असाच काहीसा प्रकार ब्राझीलमधील एका 9 वर्षांच्या मुलाबाबत घडला.

ब्राझीलमधील एका 9 वर्षांच्या मुलाने गुगलवर ‘कोणालाही नकळत विमानात प्रवास कसा करायचा’ याबद्दल माहिती शोधली आणि त्याने घरापासून 2700 किमी दूरचा प्रवास केला. हा 9 वर्षांचा मुलगा मनौसमधील त्याच्या घरातून पळून गेला. तो लॅटम एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये बसला आणि ग्वारुलहोस, ग्रेटर साओ पाउलो येथे पोहोचला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा लहानगा सर्वसामान्यांच्या नजरेतूनच नाही तर सिक्युरिटीच्या नजरेतूनही सुटला. फ्लाइट ट्रान्झिट इनमध्ये होती जेव्हा क्रू सदस्यांच्या लक्षात आलं की या मुलासोबत कोणीही प्रौढ व्यक्ती नाही. तेव्हा क्रू सदस्यांनी फेडरल पोलीस आणि गार्डियनशिप काउन्सिलला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर काउन्सिलने मुलाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. शोधानंतर त्या मुलाची ओळख पटवण्यात आली. इमॅन्युअल मार्केस डी ऑलिव्हेरा असं त्याचं नाव आहे. इमॅन्युअलच्या कुटुंबीयांनी (दि. 26) फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

रात्री 10 च्या सुमारास त्याच्या आईजवळ फोन आला आणि इमॅन्युअल सापडल्याची माहिती मिळाली. दरम्यान, मुलाला त्या रात्री काउन्सिलच्या शेल्टरमध्ये ठेवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला विमानाने घरी पाठवण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. तसंच हा 9 वर्षांचा मुलगा गुगलवर सर्च करून 2700 किमी अंतरावर कसा पोहोचला? याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुसरीकडे, तपासात मुलासोबत हिंसाचार, अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही, असं पोलिसांनी सांगितलंय. तो साओ पाउलोमधील त्याच्या नातेवाईकांना भेटायला जाण्यासाठी निघाला असेल, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

5 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago