महाराष्ट्र

नाट्य परिषदेच्या नाट्य संकुलात तीन वर्षांनंतर तिसरी घंटा वाजली…

मुंबई: शनिवार (दि.  ५) ऑगस्ट २०२३ रोजी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंतराव चव्हाण नाटय संकुल रंगमंदिराचा पडदा उघडला. विशेष म्हणजे ह्या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांनी घेतला.

तसेच रंगशारदा प्रतिष्ठानचे विजय गोखले आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन ह्या संस्थांनी देखील मदत जाहीर केली.  ह्या प्रसंगी प्रथम तिकीट घेतलेल्या प्रेक्षकास अभिनेते अशोक सराफ ह्यांची स्वाक्षरी असलेले एक छोटे स्मृतिचिन्ह सुध्दा देण्यात आले. रजनी शशी प्रभू ह्यांच्या हस्ते अभिनेत्री निर्मिती सावंत ह्यांचा सत्कार करण्यात आला. अशोक सराफ ह्यांनी नाट्यगृह उत्तम झाल्याबद्दल कौतुक करत जास्तीत जास्त रसिक ह्या नाट्यगृहात येऊन विविध नाटकांचा आनंद घेतील, अशी आशा व्यक्त केली.

प्रशांत दामले ह्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नियामक मंडळ, विश्वस्त मंडळ यांच्या प्रयत्नातून नाट्यगृह नव्या रंगरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याचा आनंद कलाक्षेत्रात होत आहे. प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले व कल्याण नाट्यपरिषदचे शिवाजी शिंदे ह्या प्रयोगादरम्यान उपस्थित होते. ह्या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा (वाडा पुनर्वसन) येथील एकाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने…

7 तास ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

1 दिवस ago

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे…

2 दिवस ago

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने…

2 दिवस ago

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि.…

3 दिवस ago

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत…

3 दिवस ago