महाराष्ट्र

फडणवीस सरकारमधील या मंत्र्याला गुणरत्न सदावर्ते यांचे ओपन चॅलेंज, थेट म्हणाले…

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय. त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा आक्रमक झाला आहे. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केली आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, मला तुमच्या माध्यमातून कळाले की, मंत्रिमंडळ बैठकीतून आज छगन भुजबळ यांनी सभा त्याग केला आहे.

मी भुजबळांचे स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो. ज्याप्रकारे मंत्रिमंडळातील सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी संविधानाला धोका होईल, अशाप्रकारचा शासन निर्णय काढण्याचं धाडस केलंय.

छगन भुजबळांनी लोकतांत्रिक मार्गाने शासनाला समजावे, याकरिता बैठकीला उपस्थिती न दर्शवणे म्हणजे संविधानिक गांर्भिय त्यांनी दाखवले. संविधानिक मर्यादा त्यांनी सरकारला दाखवल्या. किती जातिवादी झालो आपण, किती? त्याचे कारण म्हणजे विरोधी पक्षातील आमदार, खासदार, सत्तेतील मंत्री मराठ्यांचे सगळे जर जातीच्याच आधारावर ठरवणार असतील तर काय होणार.

त्या समित्यांमध्ये दुसऱ्यांचे काही ऐकायचेच नसेल तर भारताचे संविधान कशाला पाहिजे. लोहार, कुंभार, गिसाडी कुणबी कोण आहे त्याकाळी जो शेती करत होते त्यांना कुणबी म्हणलं जायचं. संविधानाचे तीन तेरा वाजवायचा प्रयत्न एकत्र येत केला जातोय. मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून घेरण्याचा प्रयत्न करु नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोक्याला ताण आला की दरेगावला जात असतात. कालचा जीआर वायरस आहे हा आजच्या मंत्री मंडळ बैठकीत माघारी घ्या.

सदावर्ते यांनी पुढे म्हटले की, शिंदे साहेब, राधाकृष्ण विखे पाटील मला मंत्रालयात भेटले होते तेव्हा मी बोललो तुम्ही मसुलमंत्री असताना लोकांना स्मशान भूमी मिळत नव्हती. धनंजय मुडे, बावनकुळे का नाहीत तुमच्यासोबत? छगन भुजबळ, धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलाय. जरांग्या तू धनगर समज्याबाबत,आई बहिणीबद्दल जी भाषा काढली ती जनता लक्ष्यात ठेवणार आहे.

कालची कृती भारतीय संविधानातील कलम 348 च्या विरोधात आहे. कालच्या जीआरची कृती संविधान विरोधी आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मागास आयोग नाहीत. त्यांना शिफारस करण्याचा अधिकार नाही. शिंदे कमिटी बेकायदेशीर आहे. कालचा शासन निर्णय अल्ट्रा वायरस आहे. संविधानासोबत फ्रॉड केलाय. जरांगे स्वतः च्या स्वार्थासाठी सामाज्याची फसवणूक करतोय. कुणबी आणि मराठा वेगळे वेगळे आहेत हे स्पष्ट झाले आहे. आजच्या कॉबिनेटमध्ये निर्णय मागे घ्यावा.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी obc समज्याची माफी मागावी. तुम्ही धनगर माळी समज्याची भूमिका ऐकली का? कालचा निर्णय पाटीलकी सारखा झाला. करायचं असेल राधा कृष्ण विखे पाटील तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये मराठा भावांना नोकऱ्या द्या. मी राधा कृष्ण विखे पाटील तुम्हांना चॅलेंज देतो…सराटीत पोलिसांना मारहाण झालेले गुन्हे मागे घेऊन दाखवा..पाहुयात संविधानात दम आहे का नाही?, असे वकील सदावर्ते म्हणाले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago