महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

१० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार…

औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत मोठा बदल केला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळणार आहेत. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत.

अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत मिळणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ होणार आहे. सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे. गट ‘अ’ साठी ८८५, गट ‘ब’ साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट ‘क’ व ‘ड’ साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

17 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago