महाराष्ट्र

‘छात्रों की गुंज’ला भाजपाचा विरोध; कन्हैयाकुमारांचा घणाघात

“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, फडणवीसांसमोर कशाला झुकतील?”

पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या पुण्यात उद्या, २२ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

“भाजपाला राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा धसका घेतला असून कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कितीही अडवणूक आणि अपप्रचार केला तरी पुण्यात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार,” असा दावा कन्हैयाकुमार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.

भाजपाच्या शैक्षणिक धोरणावर टीका करताना कन्हैयाकुमार म्हणाले की, “मनुवादी विचारसरणीमुळे देशातील शिक्षण व्यवस्था बरबाद होत आहे. शिक्षण महागडे झाले असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. सरकारी शाळा बंद होता कामा नयेत. महागडे शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना रोजगाराची शाश्वती नाही. परीक्षांचे पेपर फुटणे, शिक्षणातील गैरप्रकार यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.”

‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “कोटापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाला. पुण्यातही अडथळे आणले जात असले तरी कार्यक्रम थांबणार नाही,” असे कन्हैयाकुमार यांनी सांगितले.

सोशल मीडियावर कार्यक्रमाबाबत अपप्रचार केला जात असल्याचा आरोप करत ते म्हणाले, “या कार्यक्रमासाठी पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही. विद्यार्थी स्वतःहून येत आहेत. कितीही अडथळे आणले तरी राहुल गांधी पुण्यात येणार आणि कार्यक्रमही होणारच.”“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील?” असा सवालही कन्हैयाकुमार यांनी उपस्थित केला.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…

शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची…

2 तास ago

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर…

1 दिवस ago

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…

2 दिवस ago

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

2 दिवस ago

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…

2 दिवस ago

मराठवाड्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सपकाळ मैदानात; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत बांधणीचे निर्देश

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला…

2 दिवस ago