महाराष्ट्र

‘माती जपा, पाणी वाचवा’; राज्यभर ‘महा वॉकेथॉन’चा जलसंधारणाचा जागर

मुंबई : ‘माती जपा, पाणी वाचवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशाने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या **‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’**ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जलसंधारण दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांमधून दोन लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले.

मुंबईतील वरळी येथील सागरी किनारा रस्त्यालगतच्या प्रोमेनेड परिसरात राज्यस्तरीय वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जलपूजन, जल व मृदसंधारणाची शपथ घेऊन वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, गायक संजू राठोड, अभिनेते पुष्कर श्रोत्री, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल आदी मान्यवर सहभागी झाले.

मंत्री संजय राठोड म्हणाले की, “माती आणि पाणी हे महाराष्ट्राच्या भवितव्याशी जोडलेले विषय आहेत. केवळ मंत्रालयात बैठका न घेता लोकांमध्ये जाऊन जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महा वॉकेथॉनच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.”

स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला लोकचळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत भविष्यातील पिढ्यांसाठी माती आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे राठोड यांनी सांगितले. युवकांनीही या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी महा वॉकेथॉन हा माती वाचवा, पाणी जिरवा आणि जलसंधारणाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणारा अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. तर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे आणि मातीचे संवर्धन करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले.

दरम्यान, तीन किलोमीटरच्या या वॉकेथॉनमध्ये मंत्री संजय राठोड यांच्यासह सचिन अहिर, इंद्रनील नाईक, जितेंद्र पापळकर आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले. जलसुरक्षेचा संदेश देणाऱ्या गीतांचे सादरीकरण तसेच सहभागींसाठी बक्षीस वितरणही करण्यात आले.

राज्यातील ३५ जिल्ह्यांत एकाच वेळी झालेल्या या उपक्रमातून माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश व्यापक लोकचळवळीत रूपांतरित करण्याचा संकल्प करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

3 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

4 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

7 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

7 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

7 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

8 तास ago