महाराष्ट्र

सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यातून 17.35 लाखांची ऑनलाइन फसवणूक

पाबळ (सुनिल जिते) : मलठण येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने यूपीआय आणि मोबाईल बँकिंगचा गैरवापर करून तब्बल 17 लाख 35 हजार 236 रुपये 1 पैसा परस्पर हस्तांतरित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी विनायक रामचंद्र शिंदे (वय 59, रा. रामहिरा बंगला, दत्तनगर, शिंदेमळा, मलठण) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(क), 66(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीत शिंदे घरी असताना त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील विविध खात्यांमधून त्यांच्या संमतीशिवाय वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार करण्यात आले. यूपीआय आणि मोबाईल बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून एकूण 17.35 लाख रुपयांची रक्कम अन्य खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

खात्यातील रक्कम परस्पर हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2.37 वाजता शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ऑनलाइन व्यवहारांचा मागोवा घेऊन रक्कम कोणत्या खात्यांमध्ये हस्तांतरित झाली आणि या फसवणुकीमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago