तुमची मुलं बोगस शाळेत तर शिकत नाही ना..?
औरंगाबाद: अनाधिकृत शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलाय. शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळा सुरू करणे, नियम आणि अटींची पूर्तता न करताच एडमिशन करणे, दुसऱ्या शाळांच्या यूआयडी क्रमांकावर विद्यार्थ्यांची एडमिशन असेल, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम भासवून केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवणे. असे अनेक प्रकार सर्रासपणे अनेक शहरात सुरू असल्याने यात विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक तर होतेच आहे, शिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतही खेळ सुरू असल्याचे दिसत आहे.
राज्यात तब्बल ६९० अनधिकृत शाळा आढळल्या असून यापैकी २०० शाळा शासनाने बंद केल्या असून तुमची मुलं अनधिकृत शाळेत तर शिकत नाहीये ना, हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याची ओरड सातत्यानं होतेय. शाळांची मनमानी, फी वाढ याची अनेक उदाहरणे समोर आलीयत. मात्र आता चक्क अनेक शाळाचं अनाधिकृत आणि बोगस असल्याचं आढळून आल्याने ज्ञान दानाचं काम करणाऱ्या शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसलाय.
अनधिकृत शाळा आणि बंद केलेल्या शाळांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
छत्रपती संभाजीनगर:- अनधिकृत शाळा – ०६, बंद केलेल्या शाळा – ०६
मुंबई:- अनधिकृत शाळा – ५१७, बंद केलेल्या शाळा – ८८
पुणे:- अनधिकृत शाळा -६९, बंद केलेल्या शाळा – ३२
लातूर:- अनधिकृत शाळा – ०१, बंद केलेल्या शाळा – ००
कोल्हापूर:- अनधिकृत शाळा – २८, बंद केलेल्या शाळा – २७
नागपूर:- अनधिकृत शाळा – ४०, बंद केलेल्या शाळा – ३५
अमरावती:- अनधिकृत शाळा – ०२ , बंद केलेल्या शाळा -०२
नाशिक:- अनधिकृत शाळा – २७, बंद केलेल्या शाळा -१०
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…