महाराष्ट्र

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी…

दिल्ली: पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली.

दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यानिमित्ताने सरकारला करुन दिली. पेन्शन स्कीमचा (ईएसओपी) मुद्दा सभागृहात उपस्थित झाला असून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो आवर्जून नमूद करताना देशातील साठ लाख पेन्शनर्संनी एका दिवसाचे उपोषण केले होते. त्यांचे प्रतिनिधी ४ मार्च रोजी पंतप्रधानांनादेखील भेटले होते. यावेळी त्यांनी सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याचे पालन करेल असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा प्रश्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी विचारला.

यासंदर्भात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समितीने एक अहवाल तयार केला आहे. त्याबाबतही गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने काहीही केलेले नाही ही बाबही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी निदर्शनास आणून दिली. पंतप्रधानांनी या पेन्शनर्सना त्यांच्या हक्काचा पैसा देणार असल्याचे वचन दिले आहे. या पेन्शनर्संनी आपल्या वेतनातून ४७० रुपये, ५४१ रुपये , १२५० रुपये योगदान दिले आहे. त्यांना आता मासिक निवृत्तीवेतन ४६० रुपये आहे. एवढ्या तुटपुंज्या रकमेत त्यांचा निर्वाह कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करताना या लोकांनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना आपण वाऱ्यावर कसे सोडू शकतो, असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची…

2 दिवस ago

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच…

2 दिवस ago

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल…

2 दिवस ago

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील 'हेलपाटा' कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी…

2 दिवस ago

घोलपवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे सामाजिक व धार्मिक एकोपा वाढेल; चंद्रकांत वांजळे

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे…

4 दिवस ago