महाराष्ट्र

हर्सूलमध्ये पुन्हा पाडापाडी! सोमवारपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. सोमवार, २८ जुलैपासून तिसऱ्या टप्प्याची मोहीम हर्सूलपासून सुरू होणार आहे.

मागील काही दिवसांत मनपाच्या नगर रचना विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवर मार्किंग केली होती. काही जागाधारकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढले असले तरी आता उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका थेट कारवाई करणार आहे.

सोमवारपासून हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोल पंपापर्यंत ६० मीटर रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. यानंतर क्रमशः इतर रस्त्यांवरही टप्प्याटप्प्याने पाडापाडी केली जाणार आहे.

रस्ता रुंदीकरणाची रूपरेषा अशी आहे 

1) हर्सूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोल पंप : ६० मीटर

2) नारेगाव रोड : ३० मीटर

3. सेवनहिल ते सूतगिरणी चौक 3० मीटर

4) सूतगिरणी चौक ते शहानूर मिया दर्गा चौक २४ मीटर

5) भाजीवालीबाई चौक ते आनंद गाडे चौक २४ मीटर

6) महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते मिल कॉर्नर ३५ मीटर

7) कॅन्सर हॉस्पिटल ते दिल्लीगेट  ३५ मीटर

नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि वेळेत स्वतःहून अतिक्रमण हटवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

9 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago