मणिकर्णिका घाटावरील तोडफोडीची करणार पाहणी
मुंबई: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पवित्र मणिकर्णिका घाटाची बुलडोझरद्वारे तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या कारवाईत घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंग उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन झालेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे.
मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकास’ या नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यापूर्वीही काशी परिसरात अनेक मंदिरे पाडण्यात आल्याचे आरोप करण्यात आले असून, आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे उद्ध्वस्त करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.
हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाचा अपमान नसून, धनगर समाजासह संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेवर आघात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…