महाराष्ट्र

लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली पाहिजे आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्यासोबत काँग्रेस असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष भाजपा विरोधात लढत आहे, शरद पवार हे इंडिया आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत, काही राजकीय घटना घडली तर त्यानंतर भूमिका घेता येईल. राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय हे स्थानिक पातळीवर घेतले जातील असेही सपकाळ म्हणाले.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले असून सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकार सोबत असल्याचे जाहीर केले आहे. एकदिलाने एकसंध राहून दहशतवादाचा मुकाबला करून दहशतवाद समुळ संपवला पाहिजे. आपण २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस दुभंगलेला समाज पाहिला तसे यावेळी दिसत नाही हे विशेष महत्वाचे आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. काही जण दावे करून हवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची गरज नाही, चुकीच्या घटना टाळाव्यात असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago