शिरूर तालुका

शिरूर! गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘शतक’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन…

शिरूर: न्हावरा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशाने “शतक ” या देशभक्तीपर चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हा उपक्रम भाजपा पदवीधर आघाडी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे यांच्या पुढाकारातून तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे आणि राहुल गव्हाणे मित्र परिवार यांच्या सहकार्याने पार पडला. निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेतून न्हावरा येथील गुंजन थिएटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिरूर तालुक्यातील भैरवनाथ उच्च व माध्यमिक विद्यालय (आळेगाव पागा), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी तसेच उरळगाव येथील विद्यालयांमधील एकूण २०५ विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना देशभक्तीपर चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संभाजीआप्पा गवारे (पुणे जिल्हा संघचालक), प्रभाकर मुसळे (संस्थापक संचालक, बाबुराव दौंडकर स्मारक समिती), सूर्यकांत शिर्के, शामराव फुलावरे (ज्येष्ठ स्वयंसेवक), जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे, भाजपा पदवीधर आघाडी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे, निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच हनुमंत काळे, कौशल्य विकास रोजगार नाविन्यता मंत्रालय आयटीआय आयएमसी संचालक महाराष्ट्र शासनचे विठ्ठलराव वाघ या कार्यक्रमाचे संयोजक तथा निमगाव म्हाळुंगी चे माजी सरपंच बापूसाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “संभाजी महाराज की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान” आणि “जय श्रीराम” अशा घोषणा देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजावी आणि भावी पिढी सुसंस्कारित व देशासाठी कार्य करणारी घडावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पुणे विभाग संघचालक संभाजीआप्पा गवारे यांनी व्यक्त केले. देशभक्तीच्या मूल्यांवर आधारित अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सुरू ठेवणार असल्याचे भाजपा पदवीधर आघाडी उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुंजन थिएटर चे मालक शहाजी पवार, शरद रासकर, प्रशांत रासकर, सागर जांबळकर, दत्ता बळीनवर, दत्ता जांबळकर, चंद्रशेखर काळे, विजय बेनके, बाबासाहेब दौंडकर, साईनाथ राऊत, सागर कुसाळकर, प्रशांत कुसाळकर, कुणाल काळे, स्वयंम काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकौशल्य विकास रोजगार नाविन्यता मंत्रालय आयटीआय आयएमसी संचालक महाराष्ट्र शासनचे विठ्ठल वाघ यांनी केले तर आभार या कार्यक्रमाचे संयोजक तथा मा. सरपंच बापूसाहेब काळे यांनी मानले.

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी ग्रामस्थांना घडवली विमानाने काशी यात्रा अन् गंगापूजन सोहळा…

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांचे मोठं मन; ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन…

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago