मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “दादांची कमी कधीच भरून निघणार नाही. आमच्यासारखे अनेक लोक वाट बघत होते. पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचललं आहे. आज आम्ही दादांना खूप मिस केलं.”
या शपथविधीवर ‘एवढी घाई कशासाठी?’ अशी टीका होत असताना, त्यावर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, “शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. पार्लमेंटरी बोर्डात जो निर्णय झाला आहे, तो आम्हाला आमदार म्हणून पाळावाच लागतो. लोक काय टीका-टिप्पणी करतात यापेक्षा पक्ष सांभाळणं महत्त्वाचं आहे.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “या दुःखाच्या क्षणी सर्वांना सावरणं अत्यंत गरजेचं होतं. पक्ष, कार्यकर्ते आणि समर्थकांना एकत्र ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी अत्यंत जड अंतःकरणाने हा निर्णय घेतलेला आहे.”
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, “विलिनीकरणाच्या चर्चा अनेकदा झाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. मी त्यावर बोलण्याइतका मोठा नाही.”
मिटकरी पुढे म्हणाले, “पक्ष एकत्र असायलाच हवा. साहेब आणि आम्ही एकत्र असायलाच हवे. पक्ष एकत्र नसेल, तर दुसरे लोक घुसखोरी करतात. स्वराज्य दुर्लक्षित झालं, तर दुसरेच येऊन राज्य करतात.”
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…