महाराष्ट्र

जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न गरजेचे: डॉ. श्रीपाल सबनीस

मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले.

संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महापालिकेचे निवृत्त अतिरिक्‍त आयुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक, राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्‍ते विकास लवांदे, अनिल ताडगे, दिग्विजय कोळपे-जाधव, भाऊ मडके, संतोष नानवटे, वैभव साळुंके उपस्थित होते.

लवांदे म्हणाले, “जाती संघटना वाढतच असतील, तर राष्ट्राची बांधणी कशी होणार आणि केव्हा होणार याची चिंता वाटत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.’ डॉ. पवार यांनी जातीव्यवस्था संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. ज्ञानेश्‍वर मोळक यांनी मराठा समाजाने जातीव्यवस्था संपवण्यासाठी कृती करावी, असे आवाहन केले. जगजीवन काळे यांनी प्रास्ताविक, मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago