महाराष्ट्र

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

मुंबई: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत.

सर्व विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी ओळख आहे. परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आठवणीत राहणारा टप्पा असून, गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी परिश्रमपूर्वक तयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र मेहनत घेतली असून, त्या कष्टांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसून, त्यात आई-वडिलांची स्वप्नेही असतात, असे सांगून मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे, सकारात्मक विचार करण्याचे आणि कोणतेही दडपण न घेता परीक्षा देण्याचे आवाहन केले. परीक्षेच्या काळात आरोग्य जपावे, पुरेशी झोप घ्यावी, सकस आहार घ्यावा, मन शांत ठेवावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावे, यावरही त्यांनी भर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना, कष्टाने, जिद्दीने आणि पालक-शिक्षकांच्या आशीर्वादाने विद्यार्थी स्वत:बरोबरच राज्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वासही मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago