महाराष्ट्र

अखेर राहुल गांधींनी घोळाचे पुरावे दिलेच

कर्नाटक: काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून भारतीय निवडणूक आयोगावर सातत्याने मतदान चोरीचा आरोप केला जात आहे. त्याबाबत त्यांनी गुरूवारी काही महत्वाचे पुरावेच दिले आहेत. एकाच व्यक्तीचे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील मतदारयादीतही नाव असल्याचे समोर आले आहे. तसेच 70 ते 80 जण एकाच खोलीत राहत असल्याचा पत्ताही मतदारयादीत असल्याचे पुरावे राहुल यांनी दाखवले.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे मतदान चोरीचे ठोस पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. त्यांनी त्यासाठी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाची माहिती दिली. या मतदारयाद्यात त्यांनी यावेळी दाखवल्या.

लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघात 1 लाख 250 मतांची चोरी झाल्याचा दावा राहुल यांनी केला. पाचप्रकारे ही चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदारयादीत 11 हजार 965 डुप्लिकेट मतदार आढळले. तर 40 हजार 9 मतदारांच्या नावासमोरील पत्ते चुकीचे किंवा बनावट होते. एकाच पत्त्यावर तब्बल 10 हजार 452 मतदार आढळून आल्याचा मोठा दावाही त्यांनी केला. तर नवमतदारांच्या नोंदणीसाठीच्या फॉर्म 6 चा गैरवापर झाल्याचे 33 हजार 692 प्रकार घडल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

काँग्रेसच्या टीमने काही पत्त्यांवर जाऊन मतदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित पत्यांवर मतदार आढळून आले नाहीत, असे राहुल यांनी सांगितले. एकाच घरात 70 ते 80 मतदारांची नोंद झाली होती. त्या घरांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. हे केवळ एकाच मतदारसंघातील असून अशा अनेक मतदारसंघात से प्रकार घडल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

श्रीवास्तव नावाच्या एका मतदाराचे कर्नाटकसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही मतदान असल्याचा पुरावा राहुल यांनी दाखविला. असे अनेक मतदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाकडून आम्हाला मतदारयाद्यांचा डिजिटल डेटा देण्यात आला नाही. त्यामुळे एकाच विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांची तपासणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. 40 ते 50 जणांची टीम अव्याहतपणे मतदारयाद्यांची तपासणी करत असल्याची माहिती राहुल यांनी दिली.

महाराष्ट्रातही घोळ

महाराष्ट्रातील निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप राहुल यांनी पुन्हा केला. निवडणूक आयोगाकडे पक्षाने मशीन रिडेबल डाटा मागितला होता. सायंकाळी साडेपाचनंतर महाराष्ट्रात झालेल्या मतदानाबाबत प्रश्न होता. कारण प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती. सायंकाळी साडे पाचनंतर मतदारांच्या लांब रांगा नव्हत्या. याच कारणांमुळे आयोग भाजपसोबत असल्याचे जाणवले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्रासारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणात मतदार वाढले, पण ते कसे वाढले, कुठून आले, यंत्रणेही कसे काम केले, याचे पुरावे असल्याचेही राहुल म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago