सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या ‘दिविजा वृद्धाश्रमा’त आजीनी पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. ‘दिविजा वृद्धाश्रमा’तील आजी सौ. रासम यांनी सुगड पूजन केले तर आश्रमातील कर्मचारी अश्विनी, अस्मि, सायली व अमृता यांनी सुगड पूजेसाठी सुबक रांगोळ्या व सजावट केली. या कार्यक्रमा निमित्ताने सर्व आजींमध्ये उत्साह होता.
आश्रमातील सर्व आजींनी सुगडाची पूजा करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. नाच गाण्याच्या कार्यक्रमात छानसा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व आजोबांना बोलावून त्यांना ‘तिळगुळ घ्या व गोड गोड बोला’ असे म्हणत तिळगुळ वाटले. अतिशय आनंदपूर्ण उत्साही वातावरणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. आपण कुटुंबात असताना सर्व सण व उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करतो. तोच उत्साह आणि आनंद वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिळावा, यासाठी इथल्या व्यवस्थापनाकडून सर्व सण व उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरे केले जातात.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…