शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे दारूच्या नशेत एका तरुणाने महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वनिता अशोक सनन्से (वय २६) रा. सरदवाडी, ता. शिरूर, मुळ रा. बोराखेडी, ता. मोताळा, जि. बुलढाणा या त्यांच्या बहिणीच्या घरासमोर बसल्या असताना आरोपी राहुल तुकाराम माळी ( रा. सरदवाडी, मुळ रा. बोराखेडी) हा दारूच्या नशेत येऊन मला जेवायला दे, नाहीतर पैसे दे, मला गावाकडे जायचंय अशी मागणी त्याने वनिता यांच्याकडे केली असता वनिताने पैसे नसल्याचे त्याला समजावून सांगितले असता आरोपीने संतापून तिच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार करून एवढ्यावर न थांबता आज तुला मारूनच टाकतो अशी धमकी देत शिवीगाळ केली आहे.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वनिता गंभीर जखमी झाली असुन पोलिसांनी वनिताच्या फिर्यादीवरून राहुल माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कळमकर हे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच कारेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक महीला व मुलांना जिवंत जाळण्यात आले होते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायदयाचे भय राहीले नसून शिरूर तालुक्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…