महाराष्ट्र

त्यांचं राजकारण कचराकुंडीत गेलं; सोबत जाणारा समाप्त होईल, राज ठाकरेंना भाजप खासदारने डिवचलं

मुंबई: राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत राज ठाकेर यांनी मराठी समर्थनात हिंदी सक्तीच्या बाजूने असणाऱ्या किंवा करु पाहणाऱ्या अनेक नेत्यांना थेट झोडपून काढलं आहे.यावर आता भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. त्यांनी राज ठाकरेंसोबत जो जाइल, तो समाप्त होईल असं वक्तव्य केलं आहे.

हिंदीच्या मुद्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर भाजपच्या मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंव भाष्य केलं आहे. या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकता आहे, जा भाषिक एकता आहे, भाईचारा आहे ते तोडण्याचा प्रयत्न करणारा हा प्राणी आहे असं ते म्हणालेत.

राज ठाकरेला ज्याला जे बोलायचे आहे ते बोलावे पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे त्याला पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. तसंच, यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करत नाही आणि जे राज ठाकरेसोबत जातील ते देखील महाराष्ट्रात समाप्त होतील. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषाच्या अस्मितेचे पालन भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीने करत आहे असंही ते म्हणाले.

त्यासोबतच इतका कोणताही मराठी माणूस संस्कृतीचा आदर करु शकत नाही. पण हे लोक तर मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत ते राज ठाकरे करतात. काल झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना थेट सुनावलं होतं. तुम्ही मुंबईत या. तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे डुबेकर मारेंगे असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे हा वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

20 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

20 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

20 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

20 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

20 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

20 तास ago