महाराष्ट्र

गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा; नसीम खान

अमित शाह व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा 

मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून सुरू झालेल्या या निषेध मोर्च्यात अमित शाह यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देत निघालेला मोर्चा चांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून समाप्त करण्यात आला. यावेळी लोकाना संबोधित करताना नसीम खान म्हणाले की, लोकसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनादर करीत आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे अमित शाह यांनी सर्व जनते समोर जाहीर माफी मागावी आणि त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नसीम खान यांनी या मोर्चा दरम्यान केली. नसीम खान पुढे म्हणाले की, देशात भाजपा सरकार आल्यापासून महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यात बहुजनावरील अत्याचारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील परभणी, बीड मधील घटना असो किंवा मुंबईतील पवई येथील जयभीम नगर मधील मागासवर्गीय परिवारांना बेघर केल्याची घटना असो अशा कितीतरी घटना संपूर्ण देशात घडत असून भाजपा सरकार आणि त्यांचे नेते देशातील विविध समाजावर अशा प्रकारचे भाष्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशातील 140 करोंड जनतेला लोकशाही पद्धतीने जगण्याचा आणि राहण्याचा अधिकार दिला आहे. भाजपा आणि त्याचे नेते अशाप्रकारचे भाष्य आणि समाजात तेढ निर्माण करीत असतील तर देशातील जनता हे मुळीच सहन करणार असे म्हणत आम्ही अशा सरकार आणि नेत्यांचा जाहीर निषेध करीत आहोत.

या मोर्च्यात साधू कटके, प्रकाश बि-हाडे, गौतम साबळे, शंकर वाघ, योगिराज भोसले, कुमार कांबळे, वजीर मुल्ला, भरत सिंह, शहजादे शेख, मनोज तिवारी, रियाज मुल्ला, संजय उपाध्याय, मूर्तजा अंसारी,आशिष जाधव, नीलेश वाघमारे, रामभाऊ गजाकोश, संजय डावरे, आकाश बागले, अनिल लोंढे, शरद पवार, अशोक पोळ, रमेश बालेश, शहाजी गायकवाड, उत्तम गायकवाड, राकेश बनसोडे, दत्त निकम, अड. विजय कांबळे, अड. कैलाश अगावणे, रामेश्वर दवंडे, सहित सोनू यादव, सुरेन्द्र सिंह, अफताब आलम, सविता पवार, राधिका पवार, सुशीला यादव, परवीन शेख, हाजरा शेख, मिना भालेराव, रिटा सिंह, सुलोचना म्हाळसंघ, कमरुनीसा शेख, फरीदा शेख, मनाली गायकवाड, यांच्यासह हजारोंच्या संख्येत लोक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago