महाराष्ट्र

सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा; विजय वडेट्टीवार

गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करू नये

नागपूर: महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला दहा रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सोयाबीन शेतकऱ्यांसाठी भूमिका मांडली. सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवून घ्यावा, शेतकऱ्यांकडे जितका सोयाबीन आहे तो खरेदी करावा. सरकारने सोयाबीन शेतकऱ्यानं दिलासा दिला नाही तर यवतमाळ इथे शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करू आणि सगळा सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठेवू असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार यांनी दिला.

तसेच राज्य सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाचे मंत्री असताना त्यांच्या खात्यात घोटाळे झाले, त्यावेळीं आयुक्तांची आणि सचिवांची बदली झाली होती. आता देखील विविध आरोप होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकार का घेत नाही, इतकी या सरकारची काय मजबुरी आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महायुती सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असे वडेट्टीवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

9 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

18 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago