महाराष्ट्र

पुणे जमीन प्रकरणी जमीन विकणाऱ्यावर कारवाई होते मग जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई का होत नाही

अधिवेशनात नामुष्की होईल म्हणून सरकार कारवाई करण्याचा दिखावा करत आहे

नागपूर: पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक होते पण जमीन विकत घेणाऱ्या अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवारवर कारवाई का होत नाही? यातून मुख्यमंत्र्यांचा बारामती करांच्या पाठीशी किती मोठा आशीर्वाद आहे हे स्पष्ट होते अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने जमीन विकत घेतली. या कंपनीत ९९ टक्के भागीदारी ही पार्थ पवारची आहे. जमीन ज्यांनी विकली त्यांच्यावर कारवाई होते पण जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होत नाही? पार्थ पवारवर कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. अधिवेशनात विरोधक हा प्रश्न विचारणार याची सरकारला कल्पना असल्यामुळे काहीतरी कारवाई केल्याचा दिखावा आता सरकार करत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीला मुदतवाढ देखील यासाठी दिली आहे.या समितीचा अहवाल जर आला असता तर अधिवेशनात सरकारवर नामुष्की आली असती म्हणूनच समितीला मुदतवाढ देऊन सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

नागपूर इथे हिवाळी अधिवेशन हे तीन आठवडे चालणे अपेक्षित होतें. या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळते याकडे लक्ष असते.पण आता निवडणुकीचे कारण दाखवून अधिवेशन सात दिवसात गुंडाळण्यात येणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे दुसरीकडे आचारसंहितेचे कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करू शकत नाही, त्यामुळे या अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पानचे पुसली जाणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये इतक्या तक्रारी आल्या आहे.अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या, मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचे पुरावे तर सत्ताधारी आमदारांनी दिले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता जिथे ईव्हीएम ठेवण्यात आले तिथे सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज देत नाही, तिथे मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेले नाही, जिथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या त्या खोलीच्या बाहेर जॅमेर लावण्यात आलेले नाही यातून मतचोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे. निवडणुका झाल्या आणि २६८ जागांपैकी १७५ जागा भाजप जिंकणार हे कशाच्या आधारावर भाजपचे नेते बोलत आहेत? मतचोरी आणि मशीनच्या आधारावर सरकार बोलत आहे ना? असा सवाल वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago