आरोग्य

हिवाळ्यात आहार कसा असावा? काय खावे, काय नाही खाल्ले तर तब्येतीवर होतात परिणाम

थंडीची चाहूल लागली की शरीरात काही बदल होतात. सगळ्याच ऋतुंमध्ये आहाराला फार महत्व असते. हवामानानुसार आहारात बदल करणे आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. अशा वेळी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराला पोषण आणि उष्णता देणारे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. काही साधे बदल करुन आपण हा ऋतू निरोगीपणे आणि आनंदाने जगू शकतो.

सर्वप्रथम थंड पदार्थ टाळा. थंड म्हणजे फक्त चवीला थंड नाही तर जे मुळात थंड असतात. जसे की दही, थंड दूध, आइस्क्रीम, केळी किंवा इतर काही पदार्थ जे सर्दी वाढवतात. थंड पदार्थांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. कोमट दूध, आलं-हळदीचं दूध किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. हे शरीराला आतून उबदार ठेवतात. तसेच उष्ण पदार्थही खा. गूळ, तीळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, तूप, बाजरी, नाचणी, मेथी, आलं आणि सुंठ हे पदार्थ हिवाळ्यात विशेष फायदेशीर असतात. हे केवळ उष्णता देत नाहीत तर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताकदही पुरवतात. हिवाळ्यात सर्दी-खोकला टाळण्यासाठी सूप आणि काढे पिण्याची सवय ठेवावी. भाज्यांचे गरम सूप, टोमॅटो सूप, डाळीचे सूप यामुळे शरीराला प्रथिनं आणि उब मिळते. आलं, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि तुळशी घालून केलेला काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. असा काढा आहारात नक्की असायला हवा.

याशिवाय गाजर, मटार, पालक, मेथी, कारल यांसारख्या हिवाळी भाज्या नियमित खा. हंगामी भाज्या फार पौष्टिक असतात. या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्व ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. सकाळी थोडं तूप-गूळ किंवा चहा सोबत खजूर खाल्ल्यास शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. थंडीत पाणी कमी प्यायले जाते. घशाला कोरड पडलेली जाणवत नाही मात्र पाण्याची गरज फार असते. त्यामुळे पाणी प्यायला विसरु नका. तसेच कोमट पाणी नियमित प्या, यामुळे पचन चांगले राहते आणि त्वचा कोरडी पडत नाही. थोडक्यात सांगायचं तर, हिवाळ्यात थंड पदार्थांपासून दूर राहा, उष्ण आणि पौष्टिक पदार्थ खा, सूप आणि काढ्यांचा आस्वाद घ्या, या छोट्या सवयींनी तुम्ही थंडीच्या दिवसांतही तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago