महाराष्ट्र

जगदीप धनखड नजरकैदेत सुरक्षित नाही, खासदाराचा ‘लेटर बाॅम्ब’

दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत. ते नेमके कुठे आहे? त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे खासदार सांगत आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे.

‘आपल्या उपराष्ट्रपतींच्या बाबतीत नक्की काय घडले आहे? ते कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? देशाला या प्रश्नांची खरी माहिती मिळाली पाहिजे. दिल्लीमध्ये अफवा पसरत आहेत की धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असून ते सुरक्षित नाहीत.’, असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की,’राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित मी हे पत्र विशिष्ट कारणासाठी लिहित आहे. 21 जुलैला अचानक उपराष्ट्रपतींनी यांनी सायंकाळी सहानंतर प्रकृती कारणास्तव राजीनामा दिल्याची घोषणा झाली. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.पण यापेक्षाही धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे 21 जुलैपासून आजपर्यंत आपल्या उपराष्ट्रपतींच्या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही.’

‘ते सध्या कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? या बाबींवर कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेतील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश आले. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद साधता आला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.’, असे देखील राऊत यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी…

‘राज्यसभेतील खासदार तर सर्वोच्च न्यायालयात ‘हेबिअस कॉर्पस’ याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. कारण आम्हाला धनखड यांच्या ठिकाणाबाबत व त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जाण्यापूर्वी मी आपल्याकडून माहिती मागणे योग्य ठरेल असे मला वाटले. आपण माझी भावना समजून घ्याल आणि जगदीप धनखड यांच्या सध्याच्या ठिकाणाबाबत तसेच त्यांच्या सुरक्षितते व प्रकृतीबाबत खरी माहिती द्याल, अशी मला आशा आहे.’ असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago