महाराष्ट्र

शक्तीपीठ विरोधात न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई लढूया; आमदार सतेज पाटील

शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार; आमदार सतेज पाटील

मुंबई: शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकित ते बोलत होते.

शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी, शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची मोठी धास्ती होती, म्हणून कोल्हापुर पूर्ता महामार्ग रद्दचा निर्णय सत्तेतील काही मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र याला कायदेशीर आधार नाही. सरकार मध्ये राहायचं, आणि त्यांच्याच मंत्र्यांनी आणि आमदारानी वेगवेगळी स्टेटमेंट करायचं हे सरकारच षडयंत्र असल्याची टिकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.

गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या असताना सुद्धा शक्तीपिठ का लादला जातं आहे.. 86 हजार कोटीचा हा प्रकल्प असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम पाहता एका किलो मीटरला, 110 कोटींचा खर्च येणार आहे…शक्तिपीठ मध्ये कोण फित्तुर होऊ नये यासाठी काळजी घेऊया. न्यायालयात जाण्याऐवजी ही लढाई रस्त्यावर करुया, असंही त्यांनी सांगितलं. येणाऱ्या अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणुन आम्ही सर्व जण ताकतीने प्रश्न मांडू आपापल्या जिल्हयातील आमदारांचे शक्तीविरोधाबाबत पत्र घ्या. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असुन अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात 12 मार्चला भव्य मोर्चा काढण्याचही आम. सतेज पाटील यांनी जाहिर केल. शेतकऱ्यांची ताकत सरकारला दाखऊन देऊ, मोठया संख्येने या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं.

ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. आता या लढ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत राज्य, महायुती सरकारला चालवायचं होतं. मात्र शेतकऱ्यावर अन्याय सुरू आहे. हे सरकार गोरगरीब लोकांना मदत करणारे नाही. कधीही पोट न भरलेली, माणस मंत्री मंडळात आहेत. त्यांना सर्व सामान्यांशी देणंघेणं नाही, अशी टिकाही त्यांनी केली. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी, सामाजिक न्यायासाठी कोल्हापूर भूमी ओळखले जाते. शक्तीपीठालां होणारा विरोध पाहून सत्ताधिस हादरले आहेत.

राज्यातील दहा जिल्हातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.एकाही आमदार बरोबर बैठक झाले नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगत असून शेतकर्यांचे शेतजमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला. भाजपचे कोण कंत्राटदार आहेत त्यांच्या नावा निशी त्यांचा भांडा फोड करण्याचा इशाराही गिरीश फोंडे यांनी दिला. लातूर जिल्हयातील गजेंद्र यळकर यांनी, शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या जात आहेत. नदीजोड सारखे प्रकल्प द्या बागायती जमिनीवर आरक्षण टाकणारे प्रकल्प नको. अशी मागणी केली.

सोलापूर येथील शेतकरी विजयकुमार पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा सोडुन इतर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याच भासवण्यात येत आहे. मात्र सोलापूर जिल्हातूनही आमचा शक्ती पिठाला विरोध आहे. त्यामुळं सरकारनं दिशाभूल करू नये. असं सांगीतल.

आमच्या जमिनी आमदारांच्या बापाच्या आहेत काय. असा परखड सवालही त्यांनी केला..परभणी येथिल शेतकरी शांतिभूषण कचवे यांनी, शक्तिपीठ लादू नका अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल. असा इशारा दिला. सांगली येथिल घनशाम नलवडे यांनी, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा महामार्ग असल्याचं सांगितलं.हिंगोली येथिल सूरज माळवाड यांनी, देखिल हिंगोली जिल्ह्यातून आमचा विरोध असल्याच सांगीतल. नांदेड येथील कचरू मुढळ यांनी, शक्तिपीठ महामार्ग लादल्यास आम्हीं प्राणाचं बलिदान देऊ. असा इशारा दिला. धाराशिवनगर येथिल संभाजी फडतारे यांनी, आम्ही आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. शक्तिपीठ रद्द करा. अशी मागणी केली. यावेळी धाराशिवनगर येथिल सुदर्शन पडवळ, कणेरीवाडी येथील आनंदराव भोसले या शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केल. या बैठकीला, आमदार जयंत आसगावकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम,शेतकरी संघाचे संचालक सर्जेराव देसाई, बीडचे शेतकरी लालासाहेब शिंदे, हिंगोलीचे बापूराव ढेरे , नांदेडचे सुभाष मारेलवर, विक्रांत पाटील किणीकर, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, उत्तम सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

3 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

12 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

12 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

14 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

18 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

18 तास ago