महाराष्ट्र

मांजरी बुद्रुक कोलवडी नगर रचना योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर

वाघोली: पुणे महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाच्या वतीने मांजरी बु। व कोलवडी ता हवेली येथील २३३.३५ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक योजना मजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजनापैकी मांजरी बुद्रुक कोलवडी नगर रचना योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्या नंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद शिवराज पाटील सेवा निवृत्त उप संचालक नगर रचना यांनी लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर केली आहे.

सुमारे १५०० खातेदार शेतकरी यांची २३३.३५ हे आर क्षेत्र या नगर रचना योजनेत समावेश असून त्यामध्ये ५०% क्षेत्राचे म्हणजेच १११.६७ हे.आर चे १५३ विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देनेत आले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी २२.३३ हेक्टर क्षेत्राचे १० भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.

या योजना क्षेत्रात सुमारे ७.४५ हे आर क्षेत्र रिंगरोडसाठी व २६.०१ हे आर क्षेत्र अंतर्गत रस्ते या साठी तसेच मैदानांसाठी ७.४५ हे.क्षेत्र चे ६ भूखंड, बगीचा साठी २ भूखंड क्षेत्र १.०० हे , बालोद्यानासाठी ४ भूखंड क्षेत्र १.४१ हे.,रिव्हर फ्रंट / ग्रीन बेल्ट साठी १४.५४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

या शिवाय नागरी सुविधांमध्ये २ प्राथमिक शाळा, २ प्राथमिक आरोग्य केंद्र, घन कचरा संकलन केंद्र ,रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र,४ भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, दोन सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, ४ शॉपिंग सेंटर, या साठी देखील एकूण १४.११ हे क्षेत्राचे २४ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगर रचना योजनेतून ६५ मी रुंदीच्या १.६ कि मी रस्तासाठी लागणारे सुमारे ७.४५ हे. आर क्षेत्र ताब्यात येईल. तसेच या योजनेतून प्राधीकरणास १७.३५ हे क्षेत्राचे १२ भूखंड उपलब्ध होणार आहेत. सदरची योजनेचे लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी दि १२ ते १८ जाने २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका…

2 तास ago

शिरुर तालुक्यात बजरंग दलाच्या गोरक्षकांमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशांना जीवदान; तीन जणांवर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात कत्तलीसाठी जाणाऱ्या 5 जनावरांना वाचविण्यात शिरुर तालुक्यांतील…

3 तास ago

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल…

1 दिवस ago

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु…

2 दिवस ago

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

3 दिवस ago