Skip to content
सोमवार, एप्रिल 27, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

मांजरी बुद्रुक कोलवडी नगर रचना योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर 

महाराष्ट्र
फेब्रुवारी 6, 2023फेब्रुवारी 6, 2023शिरूर तालुका टीम

वाघोली: पुणे महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाच्या वतीने मांजरी बु। व कोलवडी ता हवेली येथील २३३.३५ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक योजना मजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजनापैकी मांजरी बुद्रुक कोलवडी नगर रचना योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्या नंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद शिवराज पाटील सेवा निवृत्त उप संचालक नगर रचना यांनी लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर केली आहे.

सुमारे १५०० खातेदार शेतकरी यांची २३३.३५ हे आर क्षेत्र या नगर रचना योजनेत समावेश असून त्यामध्ये ५०% क्षेत्राचे म्हणजेच १११.६७ हे.आर चे १५३ विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देनेत आले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी २२.३३ हेक्टर क्षेत्राचे १० भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत.

या योजना क्षेत्रात सुमारे ७.४५ हे आर क्षेत्र रिंगरोडसाठी व २६.०१ हे आर क्षेत्र अंतर्गत रस्ते या साठी तसेच मैदानांसाठी ७.४५ हे.क्षेत्र चे ६ भूखंड, बगीचा साठी २ भूखंड क्षेत्र १.०० हे , बालोद्यानासाठी ४ भूखंड क्षेत्र १.४१ हे.,रिव्हर फ्रंट / ग्रीन बेल्ट साठी १४.५४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

या शिवाय नागरी सुविधांमध्ये २ प्राथमिक शाळा, २ प्राथमिक आरोग्य केंद्र, घन कचरा संकलन केंद्र ,रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र,४ भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, दोन सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, ४ शॉपिंग सेंटर, या साठी देखील एकूण १४.११ हे क्षेत्राचे २४ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगर रचना योजनेतून ६५ मी रुंदीच्या १.६ कि मी रस्तासाठी लागणारे सुमारे ७.४५ हे. आर क्षेत्र ताब्यात येईल. तसेच या योजनेतून प्राधीकरणास १७.३५ हे क्षेत्राचे १२ भूखंड उपलब्ध होणार आहेत. सदरची योजनेचे लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी दि १२ ते १८ जाने २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.

Tagged approvalBudrukdesignGovtKolwadiManjarukNagarNewsPlanshirurtalukasubmitted

पोस्टचे नॅव्हिगेशन

बिबटयाच्या दहशतीमुळे विजेची वेळ पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
पीएच.डी. करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन अधिछात्रवृत्ती

संबंधित पोस्ट

नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

फेब्रुवारी 18, 2026फेब्रुवारी 18, 2026शिरूर तालुका टीम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा हर्षवर्धन सपकाळांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारी; अतुल लोंढे

मार्च 18, 2025शिरूर तालुका टीम

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही

एप्रिल 10, 2023एप्रिल 10, 2023शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?
  • जवस तेलाचे उपयोग
  • गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय
  • पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा
  • महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

Popular Categories

  • आरोग्य (2,222)
  • इतर (152)
  • क्राईम (1,597)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (365)
  • मनोरंजन (167)
  • महाराष्ट्र (4,675)
  • मुख्य बातम्या (2,043)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (950)
  • शिरूर तालुका (2,706)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?
  • जवस तेलाचे उपयोग
  • गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय
  • पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा
  • महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!