दादासाहेब फाळके चित्रनगरीत रंगला चित्रसंवाद
मुंबई: गेल्या ३२ वर्षांपासून दादासाहेब फाळके चित्रनगरीची परंपरा असलेल्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या चित्रसंवाद कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते मराठी कलाकार व माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात आला.
यंदाच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने राज्यभरात गणपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे `चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. त्यात कलाकारांसोबत चित्रसंवाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेक्षेत्रातील अभिनेता सुशांत शेलार, प्रमोद पवार, संदीप पाठक, महेश लिमये, दिग्दर्शक दीपक पाटील, गायक रोहित राऊत, अभिनेत्री मेघा धाडे, श्रेया बुगडे, भार्गवी चिरमुले, तेजस्विनी लोणारे, अक्षया गुरव, दैवता पाटील, निवेदिका मानसी सोनटक्के, याचबरोबर घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. त्याचबरोबर सिने समीक्षक डॉ.संतोष पाठारे, ग्लोबल टाईम्सच्या कार्यकारी संपादक शीतल करदेकर, संपादक सचिन परब, नीला टेलिफिल्मचे असिद मोदी, विस्लिंग वूडसचे चैतन्य चिंचलीकर, फ्राइम फोकसचे सुनील धैया, बॉलिवूड पार्कचे संतोष मिजगर,निर्माता महामंडळाचे बाळासाहेब गोरे, देवेंद्र मोरे, कलादिग्दर्शक डॉ. सुमीत पाटील, तसेच मुंबईतील विविध महामंडळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्री विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या असुन…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…