महाराष्ट्र

त्या तहसीलदारांची बदली झाल्याने आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप

जामखेड: जामखेड तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली येथे बदली झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी निघालेल्या या बदलीच्या आदेशानंतर तहसीलदार माळी यांना धानोरा (जि. गडचिरोली) येथे पाठवण्यात आले आहे.

अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीदरम्यान गट रचनेत विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधारी गटाचा आदेश तहसीलदार माळी यांनी नियमांचे पालन करत नाकारला. यामुळे नाराज झालेल्या सत्ताधारी नेत्याने त्यांची बदली केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून, काही गावांचा दुसऱ्या गटात समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा दबाव होता. मात्र, तहसीलदार माळी यांनी नियमांचा आदर करत हा आदेश मान्य केला नाही. यावरून एका वजनदार नेत्याने त्यांच्यावर फाइल फेकल्याची चर्चाही आहे. सत्ताधारी गट नेहमीच आपल्या सोयीने गट रचना करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याच कारणामुळे तहसीलदार माळी यांची गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात बदली झाल्याचे मानले जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत, सत्तेचा गैरवापर करून प्रामाणिक अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून ही बदली केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत, “जिल्हा परिषदेच्या गट रचनेत राजकीय सोयीनुसार गावांचा समावेश करण्याचा हट्ट तहसीलदारांनी मानला नाही, म्हणून अहंकारी नेत्याने त्यांना गडचिरोलीला पाठवले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांना क्षणिक समाधान मिळेल, पण याचा प्रशासनावर विपरित परिणाम होईल. प्रामाणिक अधिकाऱ्यांना अशी शिक्षा मिळत असेल, तर त्यांनी सत्ताधाऱ्यांचे बाहुले बनावे का? नव्या तहसीलदारांकडून गट रचनेत अपेक्षित बदल होतात का, याकडे आमचे लक्ष आहे,” असे म्हटले आहे.

हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. वास्तविक प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही.”. असे रोहित पवार यांनी म्हणले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago