नागपूर: जे आमदार पाच वर्ष निवडून येतात त्यांना पेंशन मिळते पण तीस वर्ष काम करुनही शिक्षक कर्मचाऱ्यांना पेंशन मिळत नाही हा विरोधाभास योग्य नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत केली.
महाराष्ट्रातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पेंशन म्हणजेच जुन्या पेंशन संदर्भात लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार विक्रम काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ‘एकच मिशन जुनी पेंशन’ या घोषवाक्याने आपल्या विषयाची सुरुवात आमदार विक्रम काळे यांनी करुन विषयाचे गांभीर्य सभागृहाला पटवून दिले.
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून पुढे सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेंशन योजना लागून करण्यात आली. मात्र यापूर्वी जे कर्मचारी सेवेत आले त्यांच्या शाळेला अनुदान नसल्याने त्यांना जुनी पेंशन योजनेपासून वंचित रहावे लागले या शिक्षकांचा विषय आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात मांडला. या प्रश्नाकरीता लाखो शिक्षक कर्मचाऱ्यांचा मोर्चा विधानभवनाकडे आला असल्याची माहीती त्यांनी दिली. या कर्मचाऱ्यांचे पीएफ कपात बंद असल्याने त्यांची कपात आजच सुरु करण्याची मागणी आमदार विक्रम काळे यांनी केली.
यापूर्वीदेखील या प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला होता. यासाठी सम्यक समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीने सविस्तर अहवाल सादर असला तरीही तो अजूनही त्याचे उत्तर आलेले नाही, अशी खंतही आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केली.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…