महाराष्ट्र

राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी’ या पुस्तकात ‘डंके की चोट’ प्रकरणावर लिहिले असून, मोदी सरकारने यावर जाबबादारी घेतली नाही, हा मुद्दा राहुल गांधी मांडत होते. चीन प्रकरणावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे, पण सरकारने विरोधी पक्ष नेत्याला बोलूच दिले नाही.”

सपकाळ यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरही बोलून मोदी सरकारच्या कारवायांची टीका केली. वांगचुक यांनी चीनच्या भारतात प्रवेशाच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता; त्यावरही त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

अजित पवार विमान अपघातावर शंका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले, “अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे, परंतु ब्लॅकबॉक्समधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही आणि चौकशीही होत नाही. त्यामुळे संशय वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर गंभीर दखल घेतलेली नाही. अपघाताच्या चौकशीसाठी घाई केली गेली नाही, जे आश्चर्यकारक आहे.”सपकाळ म्हणाले की, “अजित पवारसारख्या शिस्तप्रिय नेत्याचा अपघात होणे पटत नाही. जोपर्यंत अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही, तोपर्यंत प्रश्न कायम राहतील.”

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग या प्रकरणांमागे सरकारचीच निष्क्रीय भूमिका आहे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago