महाराष्ट्र

मोदींचं पुन्हा धक्कातंत्र, आज होणार मोठी घोषणा? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई: पुढच्या महिन्यात 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आता एनडीएच्या गोटात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संसद भवनात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) नेत्यांची नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत एनडीएच्या (NDA) गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार यावरुन राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जोडगोळी पुन्हा धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून चर्चेतील चेहर्‍यांऐवजी नवाच उमेदवार पुढे आणण्याची शक्यता आहे.

एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी रविवारी(ता.l7) अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे.काही दिवसांपूर्वी संसद भवनात पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत मोठी माहिती दिली होती.आता रविवारी होत असलेल्या एनडीएच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

एनडीएच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी(Vice President Election) उमेदवाराचं नाव निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कदाचित एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार येत्या 21 ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या काळात निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय या पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार,राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची नावे देखील चर्चेत आहेत.

पण आता मोदी-शाह गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांनाही उपराष्ट्रपती पदासाठी भाजपाकडून संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर संकेतानुसार ही निवडणूक 60 दिवसांच्या घेणे अपेक्षित आहे.

दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी सत्ताधारी एनडीएकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता आहे. भाजप स्वत:च्या पक्षातील नेत्याला संधी देणार की एनडीएतील घटक पक्षाच्या नेत्याला उपराष्ट्रपती करणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

8 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

8 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

9 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

14 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

14 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

14 तास ago