महाराष्ट्र

स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या भुयारी कामाला वेग; सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन टीबीएम दाखल

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या स्वारगेट ते कात्रज विस्तारित भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. या मार्गाच्या भुयारीकरणासाठी आवश्यक असलेल्या दोन अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुण्यात दाखल होणार आहेत. या मशीनचे असेंबलिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बोगदा खोदण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

स्वारगेट ते कात्रज हा संपूर्णपणे भुयारी मेट्रो मार्ग असून, त्यावरील स्थानकांच्या बांधकामासाठी आवश्यक शाफ्ट खोदण्याचे कामही सुरू झाले आहे. मार्केट यार्ड मेट्रो स्थानकासाठी शाफ्ट खोदण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

या मार्गाच्या कामातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीखाली बोगदे तयार करणे. यासाठी एकूण चार टीबीएमची आवश्यकता असून, त्यापैकी दोन मशीन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुण्यात येणार आहेत. उर्वरित दोन टीबीएम पुढील वर्षात दाखल होणार आहेत.

मशीन पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांची जोडणी व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून भुयारी खोदकाम सुरू केले जाणार आहे. या मार्गाचे बोगदे आणि स्थानकांची कामे पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना स्वारगेटहून थेट मेट्रोने कात्रजपर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीवरील मोठा ताण कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक मानधनचंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाच्या भुयारीकरणासाठी लागणाऱ्या दोन टीबीएम सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुण्यात दाखल होत आहेत. आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात केली जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

10 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

11 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

14 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

14 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

15 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

15 तास ago