महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना घेराव

मुंबई: महाराष्ट्रातील तरुणाईच्या भविष्याशी खेळ करण्याचे महायुती सरकारचे धोरण उघड झाले आहे. राज्यसेवा 2022 परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असला तरी, अद्याप 623 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या भविष्यावर घोर अन्याय होत आहे.

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता पूर्णतः हरवली असून, गलथान कारभार, अवैध हस्तक्षेप आणि निष्क्रियतेने विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष, अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा आयोगाच्या सचिवांना घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

अ‍ॅड. अमोल मातेले यांचे विधान

“राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणं थांबवलं पाहिजे. 623 उमेदवारांची नियुक्ती रखडवून सरकारने आपल्या बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. आम्ही सरकारला आणि लोकसेवा आयोगाला स्पष्ट इशारा देत आहोत – विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आमचा लढा तीव्र होईल. जर वेळेत निर्णय घेतला गेला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.”

विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने 623 अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारातील पारदर्शकता सुनिश्चित करावी. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक तणावाला कारणीभूत ठरणाऱ्या गोंधळाला पूर्णविराम द्यावा. या घेराव आंदोलनामधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून, सरकारच्या बेजबाबदार कारभाराला जाब विचारणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

24 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

24 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

24 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago