महाराष्ट्र

आता गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार ‘या’ २६ गावांचे अतिक्रमण पाडणार…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ७ जुलै महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात महामार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग आणि अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.

तसेच सिडको हद्दीतील झालर क्षेत्रातील लहान मोठी २६ गावे याप्राधिकरणात सामावून घेण्यात आली आहेत. या भागातील अतिक्रमणे पाडली आणार आहेत.

या गावांचा समावेश

सातारा-देवळाई (मनपा हद्दीत)

बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, गोपाळपूर, पिसादेवी, कृष्णापूर, तुळजापूर, सावंगी, अश्रफपूर, इस्लामपूर, ओहर, जटवाडा, दौलतपूर, बागतलाव, सहजतपूर, गेवराई, गेवराई तांडा, अंतापूर (प्राधिकरणाकडे वर्ग झालेली)

प्राधिकरणाकडील तालुकानिहाय गावे

छत्रपती संभाजीनगर: १४३

गंगापूर: ६७

फुलंब्री: १९

खुलताबाद: ४१

पैठण: ४३

झालर क्षेत्र: २६

एकूण: ३४२ गावे

आठ दिवसांत कारवाईचे अल्टीमेटम

अंदाजे १५,००० अनधिकृत बांधकामे गुंठेवारी अंतर्गत नियमित न झाल्यास, त्यावर कारवाई करण्यात येईल असे आयुक्त पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. जालना रोड, समृद्धी महामार्ग आणि झालर क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाच्या यंत्रणेची मदत घेतली जाईल. आठ दिवसांत अतिक्रमणे नियमित न झाल्यास प्राधिकरण स्वतः कारवाई करणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

22 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago