महाराष्ट्र

प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन अनिवार्य

१०० टक्के विद्यार्थी उपस्थितीचे उद्दिष्ट; सुट्टी देऊ नये; शिक्षण आयुक्तांचे आदेश

मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घ्यावी, तसेच प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राज्यातील एक लाखाहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवला जाणार असून, त्यामध्ये सुमारे दोन कोटी १० लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सिंह यांनी ही माहिती दिली.

प्रजासत्ताकदिनी शासकीय झेंडावंदन कार्यक्रमानंतर सुमारे २० मिनिटांचा सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी यापूर्वी ‘आनंददायी शनिवारी’ विद्यार्थ्यांचा सराव करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कवायतीसाठी एनसीसी व स्काउटच्या विद्यार्थ्यांची मदत घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्य जागृती व व्यायामाची आवड निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सिंह यांनी सांगितले. एकाच परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एकत्रितपणे संचलन कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

क्रीडा शिक्षकांची भरती होणार

दरम्यान, शाळांमधील पीटी तास गांभीर्याने घेतले जात नसल्याबाबत चिंता व्यक्त करत शिक्षण आयुक्तांनी क्रीडा शिक्षक भरतीचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. राज्यातील ४,८६० केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षक पदांची निर्मिती करण्यात आली असून, या पदांवर लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, सहसंचालक हारून अत्तार आणि संचालक डॉ. महेश पालकर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago