0%
Skip to content
शनिवार, नोव्हेंबर 21, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या खात्यातून 17.35 लाखांची ऑनलाइन फसवणूक

महाराष्ट्र
ऑगस्ट 21, 2026ऑगस्ट 22, 2026शिरूर तालुका टीम

पाबळ (सुनिल जिते) : मलठण येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने यूपीआय आणि मोबाईल बँकिंगचा गैरवापर करून तब्बल 17 लाख 35 हजार 236 रुपये 1 पैसा परस्पर हस्तांतरित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी विनायक रामचंद्र शिंदे (वय 59, रा. रामहिरा बंगला, दत्तनगर, शिंदेमळा, मलठण) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(क), 66(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीत शिंदे घरी असताना त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील विविध खात्यांमधून त्यांच्या संमतीशिवाय वेळोवेळी ऑनलाइन व्यवहार करण्यात आले. यूपीआय आणि मोबाईल बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून एकूण 17.35 लाख रुपयांची रक्कम अन्य खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

खात्यातील रक्कम परस्पर हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2.37 वाजता शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ऑनलाइन व्यवहारांचा मागोवा घेऊन रक्कम कोणत्या खात्यांमध्ये हस्तांतरित झाली आणि या फसवणुकीमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Tagged accountonline fraudretired police officer'sRs 17.35 lakhs

पोस्टचे नॅव्हिगेशन

‘छात्रों की गुंज’ला भाजपाचा विरोध; कन्हैयाकुमारांचा घणाघात
कारेगावच्या १९ ‘भिशां’ चा गुंता; करोडोंच्या व्यवहारामागे नेमके कोण…? नवले कुटुंबीयांपलीकडेही तपासाची गरज…?

संबंधित पोस्ट

भांडणं मिटवायचेत रस्त्यावर उभा रहा; जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची टेम्पोनं चिरडून हत्या…

ऑगस्ट 18, 2025ऑगस्ट 18, 2025शिरूर तालुका टीम

… तर किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोहीच, थांबवा हा राजकीय नंगेपना हा असा असतो का स्त्रीसन्मान?

जुलै 21, 2023जुलै 21, 2023शिरूर तालुका टीम

राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले; उदय सामंत

जून 27, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…
  • शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…
  • आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर
  • सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!
  • वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

Popular Categories

  • आरोग्य (2,428)
  • इतर (155)
  • क्राईम (1,767)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (19)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (176)
  • महाराष्ट्र (5,741)
  • मुख्य बातम्या (2,300)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (1,012)
  • शिरूर तालुका (2,958)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…
  • शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…
  • आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर
  • सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!
  • वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!