महाराष्ट्र

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींनी सामाजिक जाणीव ठेवून प्रकर्षाने पुढे यावे

मुंबई: जगभरात सर्वच देशांनी मान्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध देशातील शासनकर्ते आणि विविध लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही अनेक पातळ्यांवर यामध्ये काम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पर्यावरण, टेकड्यांच्या नाशाकडे जात असलेली विकास प्रक्रिया, नद्यांचे पुनरुज्जीवन, जलव्यवस्थापन अशा विषयांवर भारतात काम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सामाजिक जाणीव ठेवून प्रकर्षाने पुढे यावे, असे आवाहन आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

एम आय टी पुणे, स्कूल ऑफ गव्हर्नमेंट द्वारा मुंबईत आयोजित राष्ट्रीय विधायक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या विषयात महाराष्ट्रात काम सुरू झाले असून अधिक प्रमाणात काम होण्याची आवश्यकता आहे. शहरी भागात सुरू असलेल्या पर्यावरण विरोधी कारवाया, निसर्गाचे नुकसान करणारे प्रकल्प यांना जनता विरोध करणारच. आपणही त्यात योग्य भूमिका घेणे आवश्यक आहे. कोणत्याही लढ्यात प्रभावी भूमिका घेतली पाहिजे.

डॉ. राजेंद्र सिंह यांनी जलप्रदूषण, नद्यांचे पुनरुज्जीवन विषयावर आणखी काम करण्यासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. अनेक सहभागी आमदारांनी जलप्रदूषण, जलसंवर्धन, पर्यावरण विषयात काम सुरू करण्याची आणि शासन स्तरावरून अधिक काम करण्यासाठी पुढे येण्याची तयारी दर्शविली.

या परिसंवादात महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तराखंडचे विधान सभा सदस्य आ. किशोर उपाध्याय, जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी संचालन केले. तर झारखंड, मेघालय, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, ओरिसा, कर्नाटक आदी राज्यातून आमदार सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून नरेंद्र दराडे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा तर प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनीही आपले विचार मांडले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago