मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मातेले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “नाव बदलण्याच्या राजकारणाने जनता कंटाळली आहे. केवळ ‘के.ई.एम.’चा फलक बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ केल्याने रुग्णांच्या समस्या सुटणार आहेत का?” त्यांनी रुग्णालयातील बेड्सची कमतरता, डॉक्टर व नर्सची अपुरी संख्या आणि औषधांचा तुटवडा यांसारख्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले.“नाव बदलून लौकिक मिळत नाही, कामगिरीतून मिळतो. लोकांना उपचार हवेत, फलकावरील शब्द नाहीत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारला आव्हान देत मातेले म्हणाले की, “राज्याचे पालकमंत्री म्हणून वाढत्या लोकसंख्येचा विचार करून अत्याधुनिक आणि सुसज्ज नवीन रुग्णालय उभारून दाखवा. त्या रुग्णालयाला कोणतेही नाव द्या, आम्ही स्वतः पुढाकार घेऊन आपला सत्कार करू.”दरम्यान, त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, “दिखावू निर्णयांनी जनतेची दिशाभूल करू नका. मुंबईकरांना घोषणांचा नाही, तर ठोस कृतीचा इलाज हवा आहे.”
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…