महाराष्ट्र

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका

मुंबई: पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही हल्लेखोरांना शिक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले.

तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न विचारत, “पाहलगाम हल्ल्याचा सूत्रधार साजिद जाट याला फाशी कधी देणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. हल्ल्यातील पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

परराष्ट्र धोरणावर टीका करताना त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या ४० मिनिटांच्या दूरध्वनी संभाषणाचा उपयोग पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी का करण्यात आला नाही. जाटचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी अशा चर्चांचा ठोस परिणाम दिसायला हवा होता, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवर केवळ चर्चा होऊन प्रत्यक्ष कृती न होणे, भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे तपासे यांनी सांगितले.

दरम्यान, नारीशक्ती वंदन अधिनियमावरून भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करून महिला आरक्षणाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच, महिला आरक्षण विधेयकाच्या आडून संसद सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत, इंडिया आघाडीने हा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा तपासे यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago