महाराष्ट्र

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’, सक्षम युवक, सक्षम राज्य या नाविण्यपूर्ण योजनेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार, दि. २ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे कौशल्य विकास सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी दिली आहे.

खासदार वर्षा गायकवाड, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध मान्यवर त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, उद्योजक, विविध शासकीय संस्था तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे कौशल्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माध्यमातून १८ ते ४० वयोगटातील युवकांचा कौशल्य कल जाणून घेऊन त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांना जवळच्या आस्थापना व उद्योजकांकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

5 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago