महाराष्ट्र

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत-विकसित महाराष्ट्रच्या दिशेने मोठे पाऊल; ॲड. आशिष शेलार

मुंबई: युवकांच्या क्षमतेला योग्य दिशा देत रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील पहिल्याच अशा एआय-आधारित सर्वेक्षण उपक्रमातून २०२७ पर्यंत १५ हजार युवकांना प्रशिक्षण आणि त्यापैकी किमान ५ हजार युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मुंबईतील वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम (एच पश्चिम वॉर्ड) परिसरातील सुमारे ५५ हजार घरांमध्ये १८ ते ४० वयोगटातील युवकांचा कौशल्य कल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडत आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा मूलभूत टप्पा आहे. युवकांची क्षमता आणि आवड ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी व उद्योगांशी जोडणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआय-आधारित पारदर्शक प्रक्रिया

या सर्वेक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने युवकांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौशल्ये, रोजगारातील आवड आणि प्रशिक्षणाची गरज यांचा डेटा संकलित केला जाईल. त्यानुसार शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती देऊन उमेदवारांना योग्य प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थांमार्फत स्थानिक उद्योग, कंपन्या व आस्थापनांशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी स्वतंत्र पोर्टल/वेबसाईट विकसित केली जाणार असून त्याद्वारे उद्योजक, प्रशिक्षण संस्था आणि उमेदवार यांची नोंदणी सुलभ होईल.

तीन टप्प्यांत अंमलबजावणी

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, ही योजना पुढील दोन ते तीन महिन्यांत तीन टप्प्यांत राबविण्यात येईल—

सर्वेक्षण व डेटा संकलन

कलानुसार कौशल्य प्रशिक्षण

रोजगार किंवा स्वयंरोजगार मार्गदर्शन

या उपक्रमाला जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर यांच्यामार्फत आर्थिक पाठबळ दिले जाणार असून जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ही कार्यान्वयीन यंत्रणा असेल.

‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ संकल्पना

यावेळी ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच विविध उद्योजकांसोबत प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.

ही योजना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रथमच विकेंद्रीकृत, एआय-आधारित वर्कफोर्स इंटेलिजन्स मॉडेल उभारत असून स्थानिक पातळीवरील कौशल्य, रोजगार आणि धोरणात्मक नियोजनासाठी दीर्घकालीन संरचना निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

6 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

12 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

12 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

13 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

13 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

14 तास ago