महाराष्ट्र

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

पुणे : पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरा जवळ असलेल्या केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-शिरूर-अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे.

केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असून ५३ किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरूरपर्यंत पोहचणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र आता हा प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर आणि तिथून पुढे छत्रपती संभाजी नागरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आणखी 2050कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9565रुपये इतका येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असणार आहे .

दरम्यान, पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग पूर्वी ‘एनएचएआय’मार्फत करण्यात येणार होता. त्याला मान्यताही देण्यात आली होती. मात्र, एप्रिल दरम्यान हा महामार्ग ‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआयडीसी’ यांच्यात झालेल्या करारानुसार ‘एमएसआयडीसी’कडे हस्तांतर करण्यात आला. त्यामुळे त्या प्रकल्पावर ‘एमएसआयडीसी’ मार्फत काम करण्यात येत आहे.

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago