Petrol
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणारा कामगार पेट्रोल पंप मधील ८२ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यामध्ये टाकून फरार झाला आहे. शिरुर पोलीस स्टेशन येथे महादेव शिवाजी कोकाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी हाजी येथे प्रभाकर गावडे यांच्या मालकीचे व्यंकटेशा पेट्रोल पंप असून येथे कामगार असलेल्या महादेव कोकाटे याने ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने आलेले पैसे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये घेतले, त्यांनतर गोळा झालेली रोख रक्कम मालकाकडे जमा केली. मात्र, ऑनलाईन पद्धतीने घेतेलेले तब्बल ८२ हजार रुपये रक्कम त्याच्या जवळ ठेवून घेत मालकाची फसवणूक करुन तो फरार झाला.
याबाबत प्रभाकर बापूराव गावडे (वय ६५ वर्षे रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे (रा. गायकवाड वस्ती जळगाव, ता. शेवगाव जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहेत.
शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात मित्रानेच मित्राला घातला लाखो रुपयांचा गंडा…
दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…
शिरूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर आढळला मृतदेह…
शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…