महाराष्ट्र

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय विभागाची कामे उशिराने होतात.

सोबतच, अनेक कामं सांगूनही केली जात नाहीत. भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे, त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे शिरसाट अडचणीत

शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या व्हिडीओत दोन बॅगा दिसत होत्या. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला होता. हा व्हिडीओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केलेला होता. हा व्हिडीओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं होतं. मुलगा सिद्धांतचे विवाहित महिलेसोबतचे संबंध, नंतर हॉटेल विट्सच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. आता बेडरुममधील पैशांच्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

संजय शिरसाट कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत आलेत

1) शिरसाटांकडून संभाजीनगरातील वीट्स हॉटेलच्या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. मुळात हॉटेलची किंमत 100 कोटी पेक्षा जास्त असताना शिरसाटांसाठी लिलावात किंमत कमी दाखवल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केला. कंपनी लिलावात सहभागी होण्यास पत्र नसल्याचाही दावा त्यांनी केला होता.

2) शेंद्रा एमआयडीसी मूळ जमिनीचा हेतू ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागा होती. मात्र आरक्षण बदलून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावे जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला.

3) छत्रपती संभाजीनगर शहरालगत वर्ग 2 ची जमीन नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप संजय शिरसाटांवर आहे. कोट्यवधीची जमीन कवडीमोल किमतीत घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे.

4) शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवरील जमीन शिरसाटांनी अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

5) मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले. सिद्धांतने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. नंतर त्या महिलेने ते आरोप मागे घेतले. हे आमचं पर्सनल मॅटर असल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

8 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

8 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

8 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

8 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

8 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

19 तास ago