आरोग्य

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी

वेगवेगळ्या भाज्या खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. बरेच लोक काही भाज्या इतरही दुसऱ्या भाज्यांसोबत खातात. पण असं करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारकच ठरतं. भेंडीची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात. पण भेंडी इतर काही भाज्यांसोबत खाल्ली गेली तर आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होतात.

भारतीय किचनमध्ये आरोग्यासंबंधी उपाय दडलेले आहेत. अशात उन्हाळ्यात अधिक मिळणारी भेंडी थंडी असते. जर तुम्ही भेंडी खात असाल तर त्यासोबतच काही भाज्या खाणं टाळलं पाहिजे. कारण यातील फायबर, व्हिटामिन सी, व्हिटामिन के आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स इतर भाज्यांसोबत मिळून आरोग्यासंबंधी नुकसान करू शकतात.

मूळा

जर तुम्ही भेंडी खात असाल तर त्यासोबत मूळा खाणं टाळलं पाहिजे. मूळ्यामध्ये सल्फर तत्व असतात, ज्यामुळे पोटात गॅस वाढतो. भेंडी आणि मूळा दोन्ही भाज्या विरूद्ध गुणाच्या आहेत. दोन्ही भाज्या सोबत खाल्ल्यानं गॅस, अ‍ॅसिडिटी आणि स्किन अॅलर्जी होऊ शकते.

कारले

कारले आणि भेंडी सुद्धा कधीच एकत्र खाऊ नये. या दोन्ही गोष्टी पचनासाठी वेळ लागतो. अशात जर तुम्हाला आधीच पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी आणि कारले कधीच एकत्र खाऊ नये. पोटदुखी, बद्धकोष्ठता, जळजळ अशा समस्या तुम्हाला होण्याचा धोका असतो.

वांगी

वांग्यांमध्ये असे काही तत्व असतात जे शरीरात आयर्नचं अवशोषण कमी करू शकतात. वांग्यांमध्ये काही एलर्जिक तत्व असतात आणि भेंडी चिकट असते. यामुळे पचन तंत्र प्रभावित होतं. तसेच त्वचेसंबंधी समस्याही वाढू शकतात.

बटाटे

भेंडी आणि बटाटे सुद्धा एकत्र खाणं टाळलं पाहिजे. कारण भेंडीमध्ये ऑक्सालेट नावाचं तत्व असतं, जे किडनी स्टोनचं कारण ठरतं. भेंडीमध्ये फायबर अधिक असल्यानं पचनक्रिया सुद्धा स्लो होते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, तर भेंडीमध्ये फायबर जास्त असतं. दोन्ही जर एकत्र खाल्ल्या तर ब्लड शुगर असंतुलित होऊ शकते आणि लठ्ठपणा वाढू शकतो.

फूलकोबी

फूलकोबी आणि भेंडी सुद्धा कधी सोबत खाऊ नये. दोन्ही भाज्या एकत्र खाल्ल्या तर पोट फुगणे, गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. तसेच फूलकोबीमधील तत्वांमुळे आयोडिनच्या अवशोषणात अडथळा येतो, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथींच्या कामात समस्या येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

53 मिनिटे ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

58 मिनिटे ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

1 तास ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

1 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

1 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

2 तास ago